उमेदीच्या बळावर ‘धर्मरेषा’ ओलांडून प्रेम शिकवणाऱ्या, ऊर्जा देणाऱ्या या कहाण्या खूप काही सांगतात, शिकवतात. दहशत आणि द्वेष याविरुद्ध प्रेमासह जगून दाखवण्याला पर्याय नाही!
प्रेम, लग्न-संसार, जोडीदार, सहजीवन या संकल्पना कधीच आदर्शवत नसतात. त्यांचा जाती-धर्माशी काही संबंधही नाही. तुम्ही यशस्वी सहजीवनाचा कुठलाही ‘रेडिमेड फॉर्म्युला’ असत नाही, हेही पुन्हा एकदा या मुलाखतींतून प्रतीत झालं. आंतरधर्मीय सहजीवनासाठी ‘प्रिपेअर’ होणाऱ्या आणि आधीच ‘ॲपीअर्ड’ असणाऱ्या अशा दोघांनाही या प्रत्यक्ष अनुभवांतून काहीतरी संचित मिळेल याची खात्री आहे.......