भोसले यांची दृष्टी अत्यंत जाणीवपूर्वक राजकीय आणि बाजू घेणारी आहे. भटक्या-विमुक्तांचा इतिहास हा चोर-लफंग्यांचा इतिहास नसून तो ‘शोषितां’चा इतिहास आहे!

हुशार लोक इकडे दुर्लक्ष व्हावे म्हणून संस्कृतीचे आवाहक, रंगीबेरंगी, उठावदार आणि लालित्यपूर्ण असे चित्र रेखाटतात. जगण्यातले संघर्षाचे संबंध दृष्टीआड लोटावेत म्हणून संस्कृतीचे उदात्तीकरण केले जाते. भोसले संस्कृतीचा परामर्श घेताना या प्रवृत्तीला बळी पडण्याचे टाळतात. त्याऐवजी ते भटक्या-विमुक्तांच्या जीवनात घडून येऊ पाहणाऱ्या रूपांतरणाच्या प्रक्रियेत त्यांच्या संस्कृतीची मांडणी करतात.......