या संपूर्ण ऐवजाला आपण ‘श्वासपाने’ऐवजी ‘प्राणपाने’ही म्हणू शकू. ही ‘पाने’ वाचणं हा एक सर्जनशील अनुभव आहे, हे मी खात्रीनं सांगू शकतो
श्वास म्हणजे ‘प्राण’ असं बऱ्याच ठिकाणी लिहून ठेवल्याचं मी वाचलेलं आहे. आपण एक-एक श्वास घेतो, म्हणजे प्रत्येक श्वासागणिक आपण आपल्यात एक-एक प्राण घेत असतो. आणि म्हणूनच आपण ‘असतो’. जेव्हा आपल्याला श्वास घ्यायला त्रास व्हायला लागतो आणि हळूहळू आपला श्वास सुईसारखा होत होत सूक्ष्म होत जातो आणि शेवटी थांबतो, तेव्हा आपण ‘नसतो’. राहीनेही म्हणूनच या पुस्तकाला ‘श्वासपाने’ असं नाव दिलं असावं.......