या माझ्या जुन्या गोष्टी किमान चाळीस-पन्नास वर्षांपूर्वी माझ्या आयुष्यात तरंगत आलेल्या आहेत…
लेखकाकडे म्हणून एक क्राफ्ट असावी लागते. तिच्या आधारे तो व्यक्तिरेखा आणि त्यांच्या कहाण्या रचत जातो. त्या रचण्यात निरनिराळे प्रयोग करतो. मला ते येत नाही. मी जे पाहिलं-अनुभवलं नाही, जे माझ्या काळजात रुतलं आणि रुजलेलं नाही, असं काहीही मला लिहिता येत नाही. कारण एखादं बीज घेऊन कल्पनाविलासाच्या आधारानं ते फुलवण्याची क्राफ्ट. ती माझ्याजवळ नाही. तरी मी लिहायला लागलो. कारण अनुभव. आणि माणसं
.......