विचारवंत व चळवळीतील कार्यकर्ते यांनी या पुस्तकातील मांडणीची चर्चा करणे गरजेचे आहे!
दिलीप चव्हाण जातीप्रश्नाच्या सोडवणुकीची मांडणी करताना कसबे व ऑमव्हेट यांना बाजूला सारीत, शरद् पाटलांची मांडणी करीत, बरेच पुढे जातात. “आंतरजातीय विवाहाशिवाय भारतात वर्ग समाज बनू शकतो काय?” हा त्यांचा मूलभूत प्रश्न आहे. या प्रश्नात अशी समस्या आहे की, वर्गनिर्मितीतील आर्थिकता व धर्मातील सांस्कृतिकता यांचा मेळ घालत, त्यातील मूलभूत प्रश्न असे उपस्थित करायचे की, ते जातीअंताच्या चळवळीपुढील कार्यक्रम होतील.......