या ‘जलनायिकां’नी आपल्या दुष्काळग्रस्त भागात पाणी आणलं. या परिणामाइतकाच या प्रत्येकीचा प्रवास सुंदर आहे. प्रेरणादायी आहे. आणि तो थांबलेला नाही...

‘जलनायिका’ सातारा जिल्ह्यातल्या दुष्काळग्रस्त भागातला पाण्याचा मुद्दा घेऊन भिडल्या आहेत. त्यांच्यात स्वतःबद्दल जागृत झालेला विश्वास, वर्षानुवर्षं त्यांनी सहन केलेल्या घुसमटीची जाणीव आणि आपल्या अस्तित्वाला अर्थ देणारं काम करण्याचं मोटिवेशन आणि उर्मी, या सगळ्यांचा परिपाक आहे. त्यांच्या बदलेल्या स्व-प्रतिमेच्या साक्षात्कार त्यांना त्यांच्या तहानलेल्या गावांमध्ये पाणी आणण्याच्या प्रक्रियेत करता आला.......