‘शेवटची लाओग्राफिया’ : ही कादंबरी आपल्या कथाशैलीने वाचकांच्या रुची आणि कल्पनाशैलीला बांधून टाकेल
लाओग्राफिया म्हणजे लोककथा. ही लोककथासुद्धा अपूर्ण आणि शेवटची आहे, असे लेखकाचे मत आहे. कादंबरीमध्ये नाव नसलेल्या एका आगंतुक पात्राच्या तोंडून एक आत्मकथन सांगितले आहे. हे पात्र सर्व काळात फिरणारे आहे. ते कधी चातुर्यकथा होऊन येते, कधी वीरकथा, कधी गूढ कथा होते, तर कधी लोककथा. सांस्कृतिक आशय असलेले आणि मौखिक परंपरेने जतन केलेले हे पात्र जगभर कथन करत फिरते.......