या अनुवादामुळे आपल्याला शिवचरित्राकडे बघण्याची एक नवी दृष्टी मिळेल…
बार्थलेमी अॅबे कॅरे हा सोळाव्या शतकात महाराष्ट्रभर फिरून गेलेला फ्रेंच प्रवाशी. आपल्या मराठी मुलुखात येऊन गेलेल्या परकीय लोकांनी शिवाजीराजांविषयी आपली मतं नोंदवून ठेवली आहेत. पण त्यात सर्वांत जास्त लिहिणारा माणूस आहे बार्थलेमी अॅबे कॅरे. शिवाजीराजांविषयीच्या त्याच्या नोंदी वाचताना महाराजांचं ध्येय, प्रशासन आणि कामाची पद्धत नव्यानं समजत होती. ती आपल्याही लक्षात यावी म्हणून हा अनुवाद.......