माझ्या आयुष्यात आलेल्या ‘सोयऱ्यां’नी मला जे काही दिलं, ते मांडण्याचा हा प्रयत्न…
माझी ही मांडणी म्हणजे त्या त्या व्यक्तीचं संपूर्ण चित्र नव्हे याची मला जाणीव आहे. या माणसांचा मला आलेला अनुभव, माझ्या वाट्याला आलेली ती माणसं मी शब्दांत मांडली. इतरांचा अनुभव वेगळाही असू शकेल. मला ही माणसं कशी दिसली आणि यांच्या सहवासानं मला नेमकं काय दिलं, हे मांडण्याचा मी प्रयत्न केला. ही सगळी माणसं मोठी आहेतच. ती सांगायला माझ्यासारख्याची काय गरज? या सगळ्या मोठ्या माणसांत दडलेला, सामान्यांना सहसा न दिसणारा ‘माणूस’.......