रोज सकाळी काल केलेल्या, झालेल्या चुकांसाठीचं प्रायश्चित्त नव्यानं घेण्याचा, त्यासाठी तौबा करण्याचा उत्साहही माझ्याकडं आहे. वरवर सर्व काही आलबेल आहे, पण आतून घालमेल आहे
माझ्या कलेआड माझं ऐहिक स्थैर्य येतं की, त्या स्थैर्याआड कला येते, हे मला अजून उमगलेलं नाही. कलाकाराच्या घडणीसाठी आवश्यक समजले जाणारे कटू अनुभव नाहीत, कुठलं दुःख नाही, याची खंत वाटावी; तर तसंही काही होत नाही आहे. पण सूर अजून चांगला लागायला हवा, बंदिशी अजून चांगल्या उलगडायला हव्यात, या विवंचनेत मी सतत असतो.......