‘भूमी’दर्शन : ‘द्रौपदी’ होऊ इच्छिणाऱ्या ‘मैथिली’चे… माणसाच्या अस्तित्वाला झोंबणारे प्रश्न पडलेली स्त्री
नुकतेच, १० मार्च २०२३ रोजी ज्येष्ठ कथा-कादंबरीकार आशा बगे यांना कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या जनस्थान पुरस्काराने गौरवण्यात आले. ‘झुंबर’, ‘त्रिदल’, ‘सेतू’ या महत्त्वाच्या कादंबऱ्यानंतरची ‘भूमी’ ही कादंबरी एका स्त्रीच्या आत्मभानाची, स्वत्वाची कहाणी आहे. ‘भूमी’ एका पोरक्या व बरेचसे बंधन असलेल्या मुलीची कथा आहे. हा एक ओळीचा विषय असला तरीही त्यातील भावना अत्यंत विशाल आहे.......