‘सगळेच ऋतू दगाबाज’ : यात बहुतांश प्रेमकविता आहे, पण ती उगाच उसासे सोडणारी नाही... तर ती स्त्री-पुरुष राजकारणाची मांडणी टोकदारपणे करते
कविता ननवरेंचा हा पहिलाच काव्यसंग्रह असला तरीही यात नवखेपणा नाही, पहिलेपणाचा भाबडा, भोंगळ अजागळपणा नाही. त्याचबरोबर आपण कविता लिहितो म्हणजे नेमकं काय करतो, कविता का व कशासाठी लिहायची, याचं भानही त्यांना असल्याचं जाणवतं. भोवतालच्या सामाजिक, सांस्कृतिक चौकटीला असणारा स्त्री-पुरुष राजकारणाचा संदर्भ त्यांना समजलाय, तो कवितांमधून कसा व्यक्त करायचा, हेही त्या जाणतात.......