या, इतरांच्या हातात हात घालून हा कलंक पुसून टाकूया!
मनुस्मृतीच्या समर्थकांची ही तथाकथित संस्कृती म्हणजे राष्ट्रीय आपत्ती आहे. कारण स्वतः मनुस्मृती हाच भारतीय संस्कृतीवरचा कलंक आहे. मनुस्मृतीच्या समर्थकांना मी अंतःकरणापासून आवाहन करू इच्छितो, या, इतरांच्या हातात हात घालून हा कलंक पुसून टाकूया. शोषकांचा अहंगंड आणि शोषितांचा न्यूनगंड या दोहोंचे विसर्जन करून एक विवेकी, सहकार्यशील, संवेदनशील आणि प्रतिभाशाली समाज निर्माण करूया.......