‘जरामरणा’साठी माणसाने मनाची तयारी करायलाच हवी, नाही का? जी गोष्ट अटळ आहे, तिला कसे सामोरे जायचे याची आखणी त्याने करायला हवी
म्हातारपणाची बालपणाशी केलेली तुलना योग्य असली, तरी एका बाबतीत फरक जाणवतो. बाळाला दमदाटी केलेली चालते, ते केलेली दमदाटी विसरूनही जाते; पण वयस्करांना अशा प्रकारे लहान मुलासारखे कह्यात ठेवणे शक्य नसते. बाळाचे वय वाढते तसे ते जास्तीत जास्त स्वावलंबी होत असते. त्याउलट, वयस्कराचे वय वाढते तसे त्यांचे परावलंबित्व वाढत असते. त्याचे भान त्यांना बर्याच वेळा नसते; म्हणूनच बालपणाची उपमा मर्यादित स्वरूपाची आहे.......