‘सुगीभरल्या शेतातून’ : हे संपादन भालेराव यांच्या कवितेचं पीक कसं जोमदार, दमदार आणि कसदार आहे, याचं मासलेवाईक उदाहरण आहे!
हे सुप्रसिद्ध कवी इंद्रजित भालेराव यांच्या निवडक कवितांचं संपादन नुकतंच प्रकाशित झालं आहे. पिळवणूक आणि पाचवीला पुजलेलं अस्मानी-सुलतानी संकट हे कायम शेतकऱ्यांच्या नशिबी असले तरी भालेराव यांच्या कवितेतील शेतकरी याही परिस्थितीत रडगाणं गात बसत नाही. शेतकरी आत्मविश्वासानं जगला पाहिजे, कठीण परिस्थितीतही तो संकटांना तोंड देत उभा राहिला पाहिजे, यासाठी शेतकऱ्याचं आत्मबळ वाढवणाऱ्या कविता ते लिहितात.......