‘रागविराग’ : आत्ममुग्ध करणारे काव्य... अभंग, लावण्या आणि वेदनेच्या विराण्या...
वसंत केशव पाटील हे मुख्यतः वास्तवाचे भान असणारे, अंतर्मनाशी संवाद साधणारे कवी आहेत. त्यांच्या काव्यात एकीकडे प्रेम, उत्साह आहे, तर दुसऱ्या बाजूला सामाजिक दुःख आहे. एका बाजूला आत्मपरीक्षण आहे, तर दुसऱ्या बाजूला सभोवताली घडत असलेल्या विदारक परिस्थितीचे निरीक्षण आहे, त्याविषयीची चीड आहे. समाजातील शोषितांविषयी वसंत केशव यांच्या अंतरंगात कणव आहे.......