‘ठकीशी संवाद’ : ही ठकी नक्की कोण? कदाचित ती मर्त्यतेपासून मुक्त, स्वप्न-आठवणी-अपराधी भाव-द्विधा-भीती चिंता-व्याकूळता यापासून मुक्त, अशी अलेक्सा नामक अँड्रॉइड असावी!
प्रश्न असा आहे - नाट्य प्रयोगादरम्यानचा प्रत्यक्ष शारीर भेटीचा अनुभव ठकीला (आणि आपल्यालाही) या मायावी टेक्नो-स्वर्गसुखातून जागे करणार का? या प्रत्यक्ष शारीर भेटीतून तिला (आणि आपल्यालाही) नाट्येच्छेची बाधा होणार का? या प्रत्यक्ष भेटीतून ठकीच्या शरीराची (आणि आपल्याही शरीरांची) शिवण उसवणार का? त्यातून तयार झालेल्या फटींमधून शरीरांना अमर्त्य नाट्य-विचाराची बाधा होणार का?.......