‘टिळा’ : कुठेच आक्रस्ताळा स्वर न लावता, अगदी स्पष्ट आणि नेमक्या चित्रणाने ही कविता आरपार मेंदूत घुसते
‘टिळा’मध्ये शेतकरी आणि कवी इतके एकरूप झालेले आहेत की, कवीला आता वेगळं बाजूला करताच येत नाही; कारण त्याला आता जमिनीचा श्वास वाचता येतोय! ‘बैलांच्या त्वचेलाच चिकटून आहे दुष्काळ’ असं विधान करणारा हा कवी स्वतःच्या त्वचेचे रंग सत्याच्या भुईवर पेरत निघाला आहे. आणि तो जे काय पेरत निर्धाराने निघालाय, त्यातून भाकरी साकार होणार आहे, इतका उदंड आत्मविश्वास त्याच्या छातीत भरून आहे.......