‘नोकराचा सदरा’ : निखळ भारतीय कादंबरीकाराची निखळ भारतीय कादंबरी
विनोदकुमार शुक्लही जेम्स जॉइस नाहीत. त्यांचे गाव ‘डब्लिन’ नाही आणि संतूही स्टीफन नाही. ही आत्ममुग्ध प्रदर्शनवादापासून दूर असलेली कादंबरी आहे. या कादंबरीत एक मूळ कथा आणि अनेक उपकथा आहेतच, शिवाय जगातल्या प्राचीन, तसेच लोककथेच्या परंपरेतील काही थेट असंबद्ध वाटण्यासारखी अनेक स्वतंत्र प्रकरणे आहेत, स्वगत-कथने आहेत. त्यामुळे ‘आधुनिक’ किंवा ‘प्रयोगशील’ असा घाटही तिला लाभतो.......