या पुस्तकात बिबट्या हा प्राणी कसा आहे, त्याचा माणसाशी संघर्ष का व कसा होत आहे, याचे चित्र उत्तमरीत्या रेखाटले आहे.
माजी वनाधिकारी प्रभाकर कुकडोलकर यांचे ‘बिबट्या आणि माणूस’ हे पुस्तक नुकतेच ज्योत्स्ना प्रकाशनातर्फे प्रकाशित झाले आहे. या पुस्तकाला महाराष्ट्रातील व्याघ्रप्रकल्पाचे एक अध्वर्यू विश्वास सावरकर यांनी लिहिलेली ही प्रस्तावना... मानवी वस्तीतील बिबट्याचा आढळ आणि एकूणच मानव-बिबट्या यांच्यातील संघर्षाच्या निमित्ताने बिबट्याविषयीची अतिशय रंजक, अदभुत आणि चित्तथरारक माहिती या पुस्तकात देण्यात आली आहे.......