सतत झगडत, भांडत राहणारा, बंडखोर आणि विसाव्या वर्षापासून ऐंशीव्या वर्षापर्यंत सतत वेगळी व्हिजन-जीवनदृष्टी असणारा लेखक
कादंबरी, समीक्षा, कविता, भाषाभ्यास, संतसाहित्याभ्यास इत्यादी क्षेत्रांतील नेमाडे यांची कामगिरी सुप्रसिद्ध आहे. मराठीत संस्कृतिनिष्ठ कादंबरी लिहिणारा एकमेव कादंबरीकार म्हणून नेमाडे यांचे नाव घ्यावे लागते. या लेखकाच्या वाङ्मयीन, सामाजिक व सांस्कृतिक कार्याचा सामग्ऱ्याने मागोवा घ्यावा, त्यांची निर्मितिशीलता, जीवनदृष्टी आणि कार्य यांचा साकल्याने परिचय घडावा, अशा उद्देशाने प्रस्तुत ग्रंथाची सिद्धता केली आहे.......