माझी वैचारिक निष्ठा निरीश्वरवादाशी आहे; परंतु ज्यात मी जन्मले आहे, त्या हिंदू धर्माविरोधात बंडखोरीचा मार्ग पत्करून मी निरीश्वरवादाकडे वळलेले नाही…
हा असा क्षण आहे, असा तिठा आहे आणि असा संदर्भ आहे, त्याच्या अनुषंगाने मी वयाची साठ वर्षे ओलांडलेली स्त्री, ‘मी हिंदू स्त्री का नाही?’, हे विस्ताराने सांगू इच्छिते. मी बहुसांस्कृतिक स्वरूपाच्या महानगरी तसेच प्रादेशिक वातावरणाशी परिचित आहे. मी स्वतः स्त्रीवादी आहे. अशा वेळी वेगवेगळ्या सामाजिक पार्श्वभूमी असलेल्या स्त्रीवाद्यांनी युक्तिवादाच्या माध्यमातून दिलेली आव्हाने स्वीकारण्याची माझी तयारी आहे.......