अनेक लेखकांचे स्वतंत्र लेख प्रचंड प्रभावी असले, तरी त्यांचा लेखसंग्रह सपशेल फसल्याची उदाहरणे आहेत. ‘अध्यात-मध्यात’ला हा शाप भोगावा लागत नाही!

तरुण लेखक राहुल बनसोडे यांचं नुकतंच निधन झालं. त्यांना पाचेक वर्षांपूर्वी हेमंत कर्णिक यांच्या ‘अध्यात-मध्यात’ या पुस्तकाचं ‘अक्षरनामा’साठी परीक्षण लिहायला सांगितलं होतं. त्यांनी लिहायला सुरुवातही केली. पण नंतर ते त्यांच्याकडून या ना त्या कारणानं पूर्ण झालं नाही. पुढे ते परीक्षणात काय काय लिहिणार आहेत, हेही त्यांनी सांगितलं. पण दुर्दैवानं त्यांना ते लिहून काढून पाठवणं जमलं नाही. तेच हे अपूर्ण परीक्षण.......