भिखू पारेख : ‘‘लोकशाही म्हणजेच प्रतिनिधित्व आणि प्रतिनिधित्व म्हणजे निवडणूक, असं आपण समजू नये.”
लोकशाही म्हणजे निव्वळ निवडणुका नव्हेत, तर तिचा संबंध विवेकाधिष्ठित विचारविनिमयाशी असतो, ही गोष्ट लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे. जेव्हा निवडून आलेले प्रतिनिधी चिकित्सक बुद्धी न वापरता पक्षाने घेतलेल्या भूमिकेची ‘री’ ओढतात आणि स्वतःची बुद्धी आणि प्रमाणिकपणा पक्षाच्या व्हिपकडे गहाण ठेवतात, तेव्हा ते उघडपणे विवेकाधिष्ठित विचारविनिमयाला तिलांजली देतात आणि लोकशाहीच्या पायालाच सुरुंग लावतात.......