लघुपल्ल्याचा दृष्टिकोन आणि स्वार्थाने ग्रासल्यामुळे ‘गोवा’ आणि ‘गोवेकर’ धोक्यात आलेली प्रजाती ठरली आहे!
गोवा भारतीय संस्कृतीत पुरता मिसळून गेल्यानेच भारताचं श्रेष्ठत्व सिद्ध होणार नसून गोव्याची ओळख वेगळी ठेवण्यातच भारताला गौरव प्राप्त होऊ शकतो. म्हणूनच देशाच्या शिल्पकारांनीही गोव्याची आगळी ओळख जपून ठेवण्यावर भर दिला व तिलाच आज ‘गोवेकर’, ‘गोंयकारपण’ म्हणूनच देशभर वाखाणलं जातं. या पुस्तकातील प्रत्येक लेखात तुम्हाला या वेगळेपणाची किंवा अस्मितेची अत्यंत अभिमानाने ओळख करून देण्याचा माझा प्रयत्न राहिला आहे.......