पालकत्वाच्या जबाबदारीचा सामना मुलांमधील लैंगिक जाणिवा, लैंगिक प्रवृत्ती, लैंगिक वर्तन, लैंगिक कुतूहल किंवा लैंगिक प्रेरणा यांच्याशी सतत होत असतो
असं जेव्हा जेव्हा होतं, तेव्हा तेव्हा अनेक पालक गोंधळून, चक्रावून जातात व चुकतात, हे मी गेली ३६ वर्षं सतत पाहत आलो आहे. म्हणूनच लैंगिकता व पालकत्व यांची जिथं जिथं गुंफण होते, अशा अनेक नाजूक विषयांबाबत लोकांमध्ये जागृती निर्माण व्हावी, वेगळ्या प्रकारे विचार करणं कसं शक्य आहे, याचं प्रात्यक्षिक देता यावं, आपल्याला सुचले नसले तरी मार्ग काढण्याचे इतर पर्याय नक्कीच असतात, हे दाखवून देता यावं, यासाठी हे पुस्तक लिहिलं.......