माझ्या एपिलेप्सीविषयीच्या मोकळेपणाने बोलण्यामुळे मला कधीच तोटा झाला नाही की, कधी कुणी कमी लेखलं नाही...
कितीही जनजागृती केली तरी अजूनही शंभरातला एक तरी पालक एपिलेप्सी असलेल्या मुलाचे उपचार करायला देवऋषीकडे जातोच जातो. एक तरी महाभाग पालक मुलाला फीट आल्यावर त्याच्या नाकाला फोडलेला कांदा लावताना दिसतोच दिसतो. म्हणूनच वाटतं की, जनजागृती कधीच संपत नाही! ती मला व माझ्या सहकाऱ्यांना कायमच करत राहावी लागणार. अंत:प्रेरणेतील जनजागृतीची लढाई आमची अशीच अविरत सुरू राहणार; अविरत सुरू राहणार!.......