हा प्रश्न मुख्यतः दोन राज्यांच्या मधला आहे आणि साहजिकच तो प्रश्न दोन राज्यांच्या विचाराने आणि तडजोडीने सुटला पाहिजे
फक्त मामुली लॉ अँड ऑर्डरचाच प्रश्न असता तर त्याच्याशी आमचा काही संबंध नव्हता. प्रत्येक राज्य सरकार आपल्या राज्यात लॉ अँड ऑर्डर ठेवण्यासाठी उपाय योजना करू शकते, परंतु हा प्रश्न फक्त लॉ अँड ऑर्डरचा नाही, तर तेथील जनतेच्या एका विवक्षित मागणीतून हा प्रश्न निर्माण झालेला आहे. दोन समाजांच्या भिन्न भिन्न प्रकारच्या मागणीतून हा प्रश्न निर्माण झालेला आहे.......