हे पुस्तकं वाचून वन्यजीवांवर प्रेम करणाऱ्यांची मानसिकता, त्यामागची संवेदनशीलता याची ओळख होईल!
हे पुस्तक राजेश ठोंबरे या एका व्यक्तीवरचं नाही, तर ज्याला भीती, आळस आणि किळस माहीत नाही, अशा एका अफलातून वृत्तीवरचं आहे. ज्याच्याकडे संशोधनाची दृष्टी आहे, परंतु संधी मिळाली नाही म्हणून उमेद न हरवू देता चालत राहण्याच्या जिद्दीवरचं आहे. साप, बिबट्या, वाघ यासारख्या वन्यजीवांना समजून घेण्याविषयीचं आहे.......