८ ते १८ या वयोगटातल्या मुलांना ‘इंटरनेटच्या धोक्यां’पासून वाचवायचं असेल, तर त्यांच्याशी ‘संवाद’ गरजेचा आहे आणि ‘माध्यमशिक्षण’ही
आपल्याला ‘तंत्रज्ञान’ वापरता येतंय, ‘माध्यम’ वापरता येत नाहीये. फार तर आपण असं म्हणू शकतो, त्या माध्यमाचं ‘तंत्रज्ञान’ आपण वापरायला शिकलो आहोत. ‘माध्यम’ वापरणं हे त्यापेक्षा भिन्न असतं. जिथे माध्यमांच्या चांगल्या-वाईट होणाऱ्या परिणामांची माहिती असते, किमान तोंडओळख असते; ‘माध्यमभान’ असतं, जे ग्राहक आणि वापरकर्ते म्हणून आपल्यात अजून विकसित झालेलं नाही.......