सध्याच्या विखारी आणि हिंसक पुरुषत्वाच्या काळात ‘लिंगभावसमानता’ आणण्यासाठीच्या प्रयत्नांना हे पुस्तक हातभार लावणारं आहे!
वैयक्तिक आणि सार्वजनिक आयुष्यात अहिंसक असणे, पुरोगामी समाजपरिवर्तनाच्या मूल्यांशी बांधीलकी असणे, व्यक्तिगत किंवा व्यावसायिक जीवनात अन्यायाविरुद्ध निर्भयतेने भूमिका घेत राहणे, आणि पुरुष- स्त्रियांमध्ये निकोप आणि समानतेवर आधारित नाते घडवण्याचा ध्यास मनात असणे हा वेडेपणा किंवा स्वप्नरंजित कल्पना नसून आपण स्वतः तसे घडू शकतो, हे या पुस्तकाद्वारे सिद्ध करून दाखवले आहे.......