नामदेव कोळी यांच्या ‘काळोखाच्या कविता’ या गर्भार काळोखातल्या प्रकाशवेणा आहेत
काळोखाचे गूढ उकलणे ही तर कवीची एक काव्यप्रेरणा आहे. हा काळोख आहे सर्वकष शोषणाचा, हा काळोख आहे मानवी मूल्ये हिरावणाऱ्या व्यवस्थेचा आणि त्याच्या परंपरेचा. हा काळोख आहे चंद्राच्या सावलीचा म्हणजेच अमावस्येचा! ‘काळोख्याच्या कविता’ म्हणजे अमावस्येच्या कविता! अनेक कवितांमध्ये ‘अमावस्या’ ही प्रतिमा आलेली आहे. यांतून ‘अमावस्या’ ही प्रतिमा ‘कालातीत शोषणा’चे प्रतीक रूप धारण करत या कवितांचा कल्पनाबंध झाली आहे.......