‘शक्तिमान अणू’ : अणूसारख्या क्लिष्ट विषयाची सोप्या, रंजक भाषेत ओळख करून देणारी पुस्तिका
मुंबईतलं अणूशक्तीनगर आणि तेथील विजय, आनंद, अमर, भारत, चित्रा व दीपा ही सहा मुलं व डॉ.अनुराग ऊर्फ अनुकाका यांच्याभोवती ही चित्रमय कथा फिरते. गंमतीशीर अशा लहान लहान कृती या मुलांकडून करवून घेत आणि त्यांना छोटी छोटी उदाहरणं देत अनुकाका अणूची संकल्पना समजावून सांगतात. शास्त्रज्ञ कसे असतात, याचंही एक गंमतीशीर उदाहरण आहे. यामुळे अणूसारखा क्लिष्ट विषयही आवडू लागतो.......