‘मोदी @ 20’ : पंतप्रधान मोदींच्या कल्पनांमधून एकविसाव्या शतकातील ‘नव्या भारता’ची परिभाषा तयार होत आहे…
मोदींच्या २० वर्षांच्या कारकिर्दीतले असे कोणते काम किंवा धोरण आहे, ज्यामुळे आजतागायत त्यांची जादू जनतेच्या मनावर टिकून आहे? हा प्रश्न तुम्ही एखाद्या विद्वान व्यक्तीला विचारला, तर त्यांचे उत्तर हे एखाद्या राजकीय क्षेत्रातील विचारवंतापेक्षा वेगळे असू शकते आणि प्रत्यक्ष मतदान करणार्या सर्वसाधारण मतदारांच्या मतांपेक्षा, विचारांपेक्षा भिन्न टोकाचेही असू शकते आणि तरीही त्या सर्वांची उत्तरे बरोबरही असू शकतात.......