‘इन्शाअल्लाह’ : हिंदू-मुस्लिमांमधील सांस्कृतिक देवाणघेवाणीचं चित्रण करण्याचा प्रयत्न चांगला असला तरी त्यातून पुन्हा काही सूक्ष्म, अतिसूक्ष्म एकमेकांना आंतरछेद देणारे प्रश्न निर्माण होतातच
भडकमकर हे मुळात नाटककार असल्याने दृश्यमयता हे त्यांच्या लेखनाचं एक बलस्थान आहे. त्यामुळे कादंबरीतलं दृश्य नि दृश्य डोळ्यापुढे उभं राहतं. घटनांचा पट वेगानं पुढे सरकतो आणि त्याचा दृश्य परिणाम वाचनीयता आणखी वाढवतो. लेखकानं रंगवलेला मोहल्ला अगदी वाचकाच्या डोळ्यासमोर उभा राहतो किंवा वाचकाला बसल्याजागी स्वत:च त्या त्या ठिकाणी फिरून आल्यासारखं वाटावं इतकं रसरशीत आणि उत्कट चित्रण मोहल्ल्याचं केलेलं आहे.......