लेखक प्रत्येक कथेत मानवी भावभावनांची हळूवार उकल करतात, म्हणून ती केवळ विज्ञानकथा राहत नाही, तर माणसाची कथा-व्यथा होऊन जाते

‘मिरॅकल’ हा प्रा. डॉ. सुनील विभुते यांचा विज्ञानकथासंग्रह मानवी मन, भावना व विज्ञानातील शोध यांचा सुरेख संगम वा गोफ आहे. विज्ञानातील शोध व त्याचा मानवी आयुष्यात अंतर्भाव असा आशय या संग्रहात पाहायला मिळतो. या संग्रहातील सर्वच कथा मनोवेधक, उत्कंठा वाढवणाऱ्या आहेत. सर्वच कथांमध्ये ‘मानवता’ हा मध्यवर्ती केंद्रबिंदू आहे. लेखकाला उर्दू, हिंदी, कानडी भाषेचा लहेजा चांगलाच ठाऊक आहे. त्यामुळे कथेतील पात्रे खरीखुरी वाटतात.......