‘संपादन प्रकाश’ हा जगन्मित्र रविप्रकाश कुलकर्णी यांचा गौरव नाही, एका साहित्यसेवेचा गौरव आहे!
या ग्रंथातील दुसरा भाग जिव्हाळ्याचा आहे, रविप्रकाश यांनी जमवलेल्या मैत्रचा आहे. तिथे दुग्धव्यवसायात रमूनही वाचनभूक असलेला चंद्रशेखर प्रधान यांच्यासारखा सामान्य वाचक आहे आणि मधु मंगेश कर्णिक, दिनकर गांगल यांच्यासारख्या नावाजलेल्या व्यक्तीसुद्धा आहेत. सगळ्यांच नावांचा उल्लेख केला, तर पुस्तकात तुम्ही काय वाचाल? त्यामुळे मी सर्वांच्या लेखांचे मतितार्थ सांगण्याचे टाळतो. सर्वांनी जिव्हाळ्याने लिहिले आहे.......