खाद्यसंस्कृती आणि घरगुती वापरातील वस्तू-उपकरणं हे विषय आणि लेखक कोण, तर डॉ. अरुण टिकेकर, हे समीकरण गोंधळात टाकणारं वाटावं
या पुस्तकातील लेखांचे विषय जर वरचेवर नजरेखालून घातले तर तर थोडं गोंधळून जायला होईल. खाद्यसंस्कृती आणि घरगुती वापरातील वस्तू-उपकरणं हे विषय आणि लेखक कोण, तर डॉ. अरुण टिकेकर, हे समीकरण गोंधळात टाकणारं वाटावं. परंतु हे लेख वाचल्यावर लक्षात येतं या लिखाणामागचा दृष्टिकोन आणि त्याचा बाज अगदी ‘टिकेकरीय’ आहे. अनेक पदार्थांचा, जिन्नसांचा आणि दैनंदिन जीवनातील वस्तूंचा अनेक शतकं मागे जाऊन घेतलेला हा धांडोळा आहे.......