या पुस्तकात नुसताच कोरडा निधर्मीपणा नाही, तर एकूण मानवजातीच्या कल्याणाच्या मार्गाचा घेतलेला शोध आहे… असा मार्ग जो बुद्धीलाच नव्हे, तर उदात्त भावनेलाही आवाहन करेल

डॉ. यशवंत मनोहरांसारखे आंबेडकरवादी विचारवंत विपश्यनासाधना ही आंबेडकरवादाच्या विरोधी मानतात, तर रत्नाकर गायकवाडांसारखे ज्येष्ठ प्रशासक असे मानतात की, आंबेडकरांना विपश्यना मान्यच होती. या टोकाच्या दोन्ही मतांमध्ये अडचणी आहेत. आंबेडकरी ‘नवयान’ आणि गोएंकांचे ‘विपस्सनायान’ यांच्यात शत्रुभावी विरोध नाही. दोघांचे वेगळेपण जपणे आणि तरीही दोघांमध्ये समन्वय घडवणे, संवाद घडवणे शक्य आहे, असे मला वाटते.......