‘एकट्याचे गाणे’ : कविवर्य शंकर रामाणी यांचे व्यक्तिमत्त्व आणि त्याच्याशी अविभाज्यपणे जोडली गेलेली त्यांची कविता, याचे दर्शन घडवणारे पत्रसंचित

आपण पाठवलेल्या पत्राला दुसऱ्याने तत्परतेने उत्तर पाठवले नाही की, अतिशय अस्वस्थ होणारे आणि पत्रांमागून पत्रे पाठवणारे रामाणी, मागील पत्रात आपण पाठवलेल्या कवितेवर दुसऱ्याने आपले मत कळवले नाही, तर विलक्षण नाराज होणारे, रागावणारे रामाणी, आपल्या कवितेतील शब्दाशब्दाप्रती सदैव सजग राहणारे आणि नेहमीच उत्कृष्टतेचा, परिपूर्णतेचा ध्यास घेणारे रामाणी, अशी त्यांची अनेक मनस्वी रूपे या पत्रांमधून प्रकटताना दिसतील.......