या माणसाशी लग्न करण्याच्या आधीपासून एक मनस्वी कलाकार म्हणून त्यानं माझ्या आयुष्यात स्थान मिळवलेलं होतं. मी या कलाकाराची जबरदस्त फॅन होते आणि आजही आहे

इतकं प्रचंड मोठं यश मिळवताना तो घेत असलेली मेहनत, त्याचा अभ्यास, त्याचे कष्ट, त्याची पॅशन हे मी अनुभवलं ते बायको म्हणून. आणि वाटायला लागलं, हे सगळं लोकांसमोर यायला हवं. यश मिळणं कसं आणि कधी शक्य होतं, हे आजच्या पिढीला कळायला हवं. कामाची इतकी प्रचंड व्याप्ती असलेल्या या कलावंताचं आयुष्य तरुण कलाकारांना समजायला हवं. आपल्या कारकिर्दीच्या अगदी सुरुवातीपासून अशोकनं आपल्या कम्फर्ट झोनमधून बाहेर पडून धोके पत्करलेले आहेत.......