सर्व जात-धर्म-पंथांच्या लोकांना सोबत घेऊन राज्य कशा प्रकारे यशस्वीपणे चालवले जाते, याचं उत्तम उदाहरण म्हणजेच महाराजा सयाजीराव गायकवाड
महाराजांच्या कार्यातून वर्तमानकालीन राजसत्तेला हे पुस्तक एक आदर्श वस्तुपाठ घालून देईल. त्याचबरोबर या राजसत्तेचे रागरंग बदलण्याची ताकदही या पुस्तकामध्ये आहे. सयाजीरावांच्या धर्म-साक्षरतेच्या कार्याची अवहेलना करणाऱ्या तथाकथित इतिहासकारांना हे तुलनात्मक अभ्यासाचं सत्य स्वीकारावंच लागेल. त्यातून महाराष्ट्राच्या सामाजिक सुधारणेच्या इतिहासाचा अभ्युदय होईल.......