माधव कृष्ण सावरगावकरांनी स्वत:साठी ‘अलोन’ ही नाममुद्रा निवडली आणि ती सार्थ ठरवली. या इंग्रजी शब्दाचे एकटा, एकाकी, सुटलेला, दुरावलेला, तुटलेला अशा अनेक अर्थछटा एकवटून कवी पुन्हा दशांगुळे उरतोच

काही थोरामोठ्यांचा प्रश्न खराखुरा अस्वस्थ करणारा असतो. त्यांना आणि वाचकांनाही, बालकवी म्हणाले – ‘कोठुनि येते काही कळेना उदासीनता ही हृदयाला?’ ग्रेस स्वत:मध्ये डोकावून विचारतात- ‘माझ्या मना तुला रे दुखते कुठे कळू दे’. अलोन यांच्या कविता वाचताना असे वाटले की, कवीच्या दु:खाची कारणे लौकिकामध्येसुद्धा आहेत. पण कवी त्याच्या स्वभावधर्मानुसार तपशील सांगत नाही.......