“बिली विल्डर यांनी म्हटलंय की, ‘फिल्मी डायलॉग हे एखाद्या गरीब माणसाने टेलिग्राम लिहावा तसे लिहायला हवेत.’ पण कधी कधी तुम्हाला ‘भाषणबाजी’ही करावी लागते.” - जावेद अख्तर

हिंदी चित्रपट क्षेत्रात जावेद अख्तर यांचं नाव खूपच मोठं आहे. त्यांनी सलीम खान यांच्याबरोबर ८०च्या दशकात खूप महत्त्वाच्या पटकथा लिहिल्या (जंजीर, दीवार, शोले, त्रिशूल). १९८१ मध्ये त्यांनी गीतलेखनाला सुरुवात केली. ‘हवा हवाई’ (मिस्टर इंडिया) पासून ‘एक लडकी को देखा...’ (१९४२ ए लव्ह स्टोरी) पर्यंत त्यांनी गीतलेखनात वैविध्यपूर्ण भाषेचा आणि छंदांचा उपयोग गेला. काल त्यांचा ७५वा वाढदिवस होता.......