‘डोह : एक आकलन’ - ललितगद्याचे बंदिस्त आणि सांकेतिक स्वरूप बदलून ते अधिक प्रसरणशील, मोकळे करणार्या लेखकाविषयीचा संग्राह्य, मौलिक ग्रंथराज
मराठी ललितगद्याचा परमोच्च आविष्कार असा लौकिक मिळवलेल्या आणि ललित साहित्यातील शिखर स्थानावर असलेल्या ‘डोह’ला २०१५ साली पन्नास वर्षे पूर्ण झाल्याचे औचित्य साधून विजया चौधरी यांनी ‘डोह : एक आकलन’ या ग्रंथाचे संपादन केले आहे. यामध्ये श्रीनिवास विनायक कुलकर्णी आणि त्यांच्या लेखनाविषयी लेख, श्रीनिवास कुलकर्णी यांचे स्वतःबद्दलचे लेखन, भाषणे एकत्रित केली आहेत.......