गोशाळांच्या माध्यमातून गोवंश संवर्धन करण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसला आहे. त्यामुळे निर्माण झालेली विदारक अवस्था सुधारण्यासाठी ठोस पावले उचलणे गरजेचे आहे
राज्यात गोवंश हत्याबंदी कायदा केल्यानंतर त्या कायद्याचा काय परिणाम झाला, भाकड गोवंश कुठे आहे, त्याच्या चारा-पाण्याची काय व्यवस्था केली, वृद्ध गोवंशापासून होणाऱ्या आजारावर कोणती उपाययोजना केली याची कोणताही माहिती, आकडेवारी किंवा योजना पशूसंवर्धन विभागाने आखली नाही किंवा सरकारने ही तसे आदेश दिले नाहीत. ही पशूसंवर्धन विभागाच्या कामाची शैली आहे.......