‘वीजेने चोरलेले दिवस’ : ही कादंबरी वीजेच्या प्रश्नाने गावखेड्याची, तिथल्या शेतीजीवनाची जी परवड झाली, त्याच्यावर अनेक कंगोर्यांनी प्रकाश टाकते
शेतीव्यवसायातील वीज भारनियमनाच्या मर्यादित प्रश्नाने सुरू होणारी ही कादंबरी शेतकर्यांचे प्रश्न, शेतीव्यवसायाकडे आपण कसे पाहतो व व्यवस्थेने शेतीव्यवसायाची कशी छळछावणी केली आहे, ही वस्तुस्थिती समोर ठेवते. वीज समस्येला केंद्रस्थानी ठेवत कृषिव्यवस्थेचा आणि बदलत्या गावखेड्याचा आंतरछेद घेतला आहे. लोकशाहीच्या व्यवस्थेचे तळपातळीवरील कार्यरत असणे वास्तवचित्रणातून दाखवून दिले आहे........