कॅन्सरविषयी हवी तेवढी जनजागृती झालेली नाही. त्याविषयी अधिक माहिती देणं आवश्यक आहे. हे पुस्तक त्या दिशेनं टाकलेलं एक छोटंसं पाऊल आहे
कॅन्सरच्या बाबतीत अनेक प्रश्न आहेत. त्या प्रश्नांचा उलगडा करणं हेदेखील या पुस्तकाचं उद्दिष्ट आहे. सुदैवानं आज या आजाराच्या निदानात आणि उपचारात खूप प्रगती झालेली आहे. आधुनिक उपचारांनी तीनपैकी दोन रुग्ण पूर्ण बरे होतात, ही आजची वस्तुस्थिती आहे. या क्षणी सगळ्याच प्रकारच्या कॅन्सरवर शंभर टक्के विजय मिळवता आल्याचा दावा खोटा ठरेल. परंतु बरंच काही चांगलं घडलं आहे, घडत आहे
.......