कवीच्या मानगुटीवर ‘कवितेचा वेताळ’ प्रश्नांची मालिका घेऊन बसलेला असतो!
कवी समकाळात आपल्या कविजगताला फटकारताना दिसतो. माझ्यातला कवी मरत चाललाय, असे जेव्हा म्हणतो तेव्हा आजच्या समकाळातल्या तमाम कवींना कवी म्हणून आपली आणि कवितेची उलटतपासणी करण्याचा सल्लाही देतो. समकाळ हा विषण्ण आणि अस्वस्थ करणारा आहे. कवीला कविताच लिहिता येत नाही. कवीला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करताना कविता कवीला अनेक प्रश्न विचारताना जराही कचरत नाही.......