लोकशाही एका आदर्शवत अवस्थेत स्वत:मध्ये कलेचं चैतन्यतत्त्व सामावून घेत असते, अशी माझी धारणा आहे...
लोकशाही व्यवस्थेसारख्याच पण ती प्रत्यक्षात रुजण्याआधीच्या काळात मनुष्यप्राण्याने स्वतःमधल्या ऊर्मी जिवंत ठेवण्यासाठी अमूर्त शक्यतांमधून असंख्य आकृतिबंध, प्रवाह, कलात्मक रचना आकारास आणल्या. कलेच्या अभिव्यक्तीतून आपण खरेखुरे, इमानी, भावयुक्त आणि उत्फुल्ल राहू, अशी आशाही त्याने वारंवार बाळगली. मी तर म्हणतो, प्रत्येक संस्कृती कलानिर्मितीच्या शक्यतांचा अर्थ लावण्याचा आपापल्या परीने मार्ग शोधत असते.......